अक्षय चव्हाण यांचा प्रेरणादायी निर्णय; मृत्यूनंतर देहदानाचा संकल्प

Rokhthok Maharashtra 17 0

रयत विद्यार्थी विचार मंच चे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष अक्षय तानाजी चव्हाण यांनी एक अत्यंत प्रेरणादायी आणि समाजाला दिशा देणारा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रशिक्षणासाठी मृत्यूनंतर देहदान करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. यासाठी त्यांनी कृष्णा विश्व विद्यापीठ येथील अॅनाटॉमी विभागाकडे अधिकृत अर्जही सुपूर्द केला आहे.

अक्षय चव्हाण म्हणाले, “मृत्यूनंतर शरीराची राख होते… पण तेच शरीर जर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडणार असेल, तर ती माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
त्यांच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून अनेकांनी हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं म्हटलं आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.