पुणे

बाईकच्या भावात बोकड! चाकण बाजारात प्रचंड गर्दी

“अहो आहात कुठे…? बाईकच्या भावात बोकड मिळतोय!”
बकरी ईद जवळ येताच पुणे जिल्ह्यातील चाकणच्या जनावरांच्या बाजारात प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे… 

चाकण बाजारपेठेत राज्याच्या विविध भागांतून व्यापारी आणि ग्राहक दाखल झाले आहेत.
राजस्थान, सोलापूर, अहमदनगरसह अनेक भागांतून खास बोकड विक्रीसाठी आणले गेले आहेत. उंच, वजनदार आणि आकर्षक सजवलेल्या बोकडांकडे ग्राहकांचं विशेष लक्ष आहे. 

साधारण बोकडांच्या किंमती हजारांपासून सुरू होत असल्या तरी काही खास जातींच्या बोकडांना लाखो रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.

विशेष म्हणजे काही ग्राहक आधीच बुकिंग करून पसंतीचे बोकड खरेदी करत असल्याचं चित्र आहे.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर चाकण बाजारात आतापर्यंत तब्बल सात ते आठ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

पुढील काही दिवसांत गर्दी आणि व्यवहार आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.