पिंपरी-चिंचवडमधील ‘ए. जे. फर्निचर मॉल’ गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.
१५ मे २०२६ रोजी रावेत-ताथवडे बीआरटी रोडवर मॉलचे मालक जगदीश बिश्नोई यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी ५ ते ६ गोळ्या झाडल्या होत्या. सुदैवाने ते बचावले.
तपासात समोर आले की, ७ मे रोजी अशोक कुमार बिश्नोई यांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकीचा कॉल आला होता.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार तयार करण्यात आलेल्या विशेष पथकांनी ३५० हून अधिक CCTV फुटेज तपासले. त्यानंतर हरिद्वार येथून बिश्नोई गँगचे ३ शूटर अटक करण्यात आले.
या हल्ल्यामागे आरजू बिश्नोई, शुभम लोणकर आणि कुलदीप उर्फ कशीश यांचा हात असल्याचे तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे कुलदीप उर्फ कशीश हा सिद्धू मूसेवाला हत्याकांडाशी संबंधित आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या तिन्ही आरोपींना २८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, तपास सुरू आहे
