पुन्हा पेट्रोल-डिझेल महाग! 10 दिवसांत तिसरी दरवाढ, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

Rokhthok Maharashtra 24 0

“सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा मोठा फटका बसलाय!
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली असून, गेल्या 10 दिवसांतील ही तिसरी दरवाढ आहे.
नवीन दरांनुसार पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी महागलं असून आता दर झाला आहे 107 रुपये 87 पैसे…
तर डिझेल 91 पैशांनी वाढून 94 रुपये 39 पैशांवर पोहोचलं आहे.
15 मे रोजी 3 रुपयांची वाढ…
19 मे रोजी पुन्हा 90 पैशांची वाढ…
आणि आता तिसरी दरवाढ झाल्याने अवघ्या काही दिवसांत इंधन जवळपास 5 रुपयांनी महागलं आहे.
इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या असून त्याचा थेट परिणाम भारतातील इंधन दरांवर होत असल्याचं सांगितलं जात आहे.
पेट्रोल-डिझेल महागल्याने वाहतूक खर्च वाढणार…
आणि त्याचा परिणाम भाजीपाला, अन्नधान्य आणि दैनंदिन वस्तूंच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे.
या सततच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.