ठरला देवदूत! विहिरीत उडी मारून 4 जणांचे प्राण वाचवले

Rokhthok Maharashtra 13 0

पंढरपूर तालुक्यातील तांदूळवाडी येथे घडलेल्या भीषण अपघातात एकीकडे आठ जणांचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे इरफान मुजावर नावाचा तरुण अनेकांसाठी देवदूत ठरला.
प्रत्यक्षदर्शी असलेल्या इरफानने छोटा हत्ती वाहन विहिरीत कोसळताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. क्षणाचाही विलंब न करता त्याने गावकऱ्यांना फोन करून मदतीसाठी बोलावले आणि थेट विहिरीत उडी मारली.

 

 

 

 

पाण्यात बुडत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकल्या आरवला त्याने सर्वप्रथम बाहेर काढले. त्यानंतर आणखी तीन जणांचे प्राण वाचवण्यातही त्याला यश आले. इरफानच्या धाडसामुळे चार जणांना नवजीवन मिळाले.
मात्र या दुर्घटनेत बावचे कुटुंबातील आई, दोन सुना आणि तीन चिमुकल्यांसह एकूण आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.