मुंबई(रोखठोक महाराष्ट्र न्युज चॅनल)
मुंबई: राहुल गांधी यांच्या मालमत्तेसंदर्भात प्रश्न विचारून स्वतःचे सरकार किती असक्षम आणि अयशस्वी आहे याची कबुली भाजपने दिली आहे. भाजपचे नेते जनतेला मूर्ख समजून वारंवार खोटे बोलून देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. देशात गेली पाच वर्ष भाजपचे सरकार असताना यांचा अर्थमंत्री आणि त्यांच्या यंत्रणा काय करत होत्या? पाच वर्ष याची चौकशी का केली नाही? तसेच भाजपच्या खासदार पूनम महाजन यांची मालमत्ता केवळ पाच वर्षात ९०० टक्के कशी वाढली? याचे उत्तर भाजपने द्यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, भाजपाकडे आयकर विभागापेक्षा जास्त सक्षम यंत्रणा आहे असे दिसते. असे असेल तर २००९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी दिलेल्या शपथपत्रात पूनम महाजन यांनी १२ कोटी रूपयांची मालमत्ता दर्शवली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील शपथपत्रात ही मालमत्ता १०५ कोटी रूपयांपेक्षा जास्त झाली. वारसा हक्काने कोणतीही मालमत्ता मिळालेली नसताना केवळ मोटर वाहन विक्री उद्योगातून ९०० टक्क्यांनी उत्पन्न कसे वाढले याचे उत्तर भाजपने द्यावे. भाजपचे आमदार राम कदम यांनी २००९ च्या निवडणूक शपथपत्रात १३ कोटी रूपयांची मालमत्ता दाखवली होती. २०१४ साली त्यामध्ये ३०० टक्क्यांनी वाढ होऊन ती मालमत्ता ३९ कोटी रूपये कशी झाली? भाजपच्या प्रसाद लाड यांनी २०१४ च्या निवडणूक शपथपत्रात १२६ कोटी रूपये दाखवलेली मालमत्ता तीन वर्षात ६६ टक्क्यांनी वाढून २१० कोटी कशी झाली? देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली असताना, नोटाबंदी जीएसटीमुळे उद्योग धंदे डबघाईला आले असताना भाजपच्या नेत्यांची संपत्तीत कशी छप्परफाड वाढ होते हे भाजपच्या नेत्यांनी देशाच्या जनतेला समजून सांगावे.

Dear immortals, I need some wow gold inspiration to create.