अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची तिच्याच प्रियकराने निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, चारित्र्याच्या संशयातून आरोपी शुभम ओव्हळ याने लोखंडी रॉड आणि फरशीने हल्ला करून मुलीचा खून केला. एवढ्यावरच न थांबता, पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने वडिलांच्या मदतीने मृतदेह जंगलात नेऊन जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने मित्राला व्हिडिओ कॉल करून संपूर्ण प्रकार सांगितला. मित्राने तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा कट उघडकीस आला.
या प्रकरणी आरोपी शुभम ओव्हळ, त्याचे वडील सुखदेव ओव्हळ आणि आई रेखा ओव्हळ यांच्याविरोधात हत्या, पॉक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेमुळे श्रीगोंदा आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
“मी जंगलात मृतदेह जाळला…” Video Call मुळे उघड झाला खूनाचा थरार | बाप-लेक अटकेत
