पुणे

एमआयटी, एडीटी, चे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश तु. कराड यांना मातृशोक

पुणे, माईर्स एमआयटी पुणेचे विश्वस्त व लातूर तालुक्यातील रामेश्वर (रई) चे माजी सरपंच तुळशीरामअण्णा कराड यांच्या पत्नी सौ. सुमित्राबाई तुळशीराम कराड (८३वर्षे) यांचे रविवारी पहाटे ६ वा. लातूर येथील राहत्या घरी निधन झाले. एमआयटी एडीटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात पती, दिर, भावजया, तीन मुले, एक मुलगी, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

सौ. सुमित्राबाई कराड या माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या भावजई होत्या. डॉ. हनुमंत कराड व बालासाहेब कराड यांच्या मातोश्री होत्या. तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड व आमदार रमेशअप्पा कराड यांच्या काकू होत्या.
संपूर्ण आयुष्य वारकरी संप्रदायासाठी अर्पण करणार्‍या सुमित्राबाई तुळशीराम कराड या काही दिवसांपासून आजारी होत्या. रामेश्वर येथे सुरू असलेल संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह व श्री राम कथा यात त्या सहभागी झाल्या होत्या. एकादशीच्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी पहाटे ४ वा. उठून त्यांनी पूजा अर्चा केली. पण पहाटे ६ वा. त्यांची प्राणज्योत मावळली.