सध्या ‘देऊळबंद २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पण या यशामागे एक भावनिक आणि प्रेरणादायी किस्सा आता समोर आला आहे.
दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी खुलासा केला आहे की, चित्रपट रिलीज होण्याआधी ‘देऊळबंद २’साठी त्यांच्याकडे DCP तयार करण्याचे पैसेही नव्हते. चित्रपटाचे बजेट १२ लाखांचे असताना DCP चे बिल तब्बल ४२ लाखांपर्यंत पोहोचले होते.
अशा कठीण काळात मदतीला धावून आले ते म्हणजे बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि त्यांची रेड चिलीज कंपनी.
प्रवीण तरडे यांच्या म्हणण्यानुसार, शाहरुख खान यांना जेव्हा चित्रपटाबद्दल आणि आर्थिक अडचणीबद्दल माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी कोणताही विचार न करता टीमला सांगितले – “उनका बिल माफ करो.”
यानंतर रेड चिलीजने तब्बल ४० ते ४५ टक्के बिल माफ केले आणि चित्रपटाला मोठा आधार दिला.
आज ‘देऊळबंद २’ १०० कोटींच्या दिशेने वाटचाल करत असताना, प्रवीण तरडे यांनी शाहरुख खानचे आभार मानत सांगितले की, “जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा त्यांनी केलेली मदत मी कधीच विसरणार नाही.”
हा किस्सा सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
“उनका बिल माफ करो!” शाहरुख खानने केली प्रवीण तरडेंना मोठी मदत, भावुक खुलासा
