पुणे

शिवाजीराव खांडेकर यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश

महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशानुसार, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक मित्र श्री शिवाजीराव खांडेकर सर यांचा काल दिनांक ५ ऑगस्ट २०२३ रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात प्रदेश अध्यक्ष, आमदार आदरणीय जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे पक्ष समावेशाचा सोहळा संपन्न झाला.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार, जेष्ठ नेते, शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच श्री. शिवाजीराव खांडेकर यांचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना माननीय जयंतराव पाटील म्हणाले की शिक्षणक्षेत्रात श्री. खांडेकर यांचे प्रचंड काम आहे, राज्य शासकीय व निमशासकीय लिपिक हक्क परिषदेचे राज्य संघटक म्हणून देखील त्यांचे कार्य मोठे आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे निश्चित अनेकजण आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडले जाणार आहेत. आदरणीय पवार साहेबांच्या मुख्यमंत्री कालावधीत सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणेच सर्व लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पवार साहेबांच्या कारकिर्दीत अनेक शासकीय कर्मचार्यांसाठी लाभदायक निर्णय घेण्यात आले होते.

शिवाजीराव खांडेकर हे चळवळीतुन पुढे आलेले तरूण कार्यकर्ता आहे. निश्चितच त्यांच्या पक्ष प्रवेशाने पक्षाची ताकद वाढणार आहे असे देखील जयंतराव पाटील यांनी सांगितले व श्री. शिवाजीराव खांडेकर व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. अशी माहिती महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय शासकीय लिपिक हक्क परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा पुणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. प्रसन्न कोतुळकर यांनी दिली.