पुणे/मावळ ( रोखठोक महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी)-
मावळ मतदार संघातून पार्थ पवार यांनी निवडणूक लढवण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी दिली. कुठल्याही पातळीवर युवती नेत्या स्मिता पाटील यांच्या नावाची चर्चा नसल्याचाही निर्वाळा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, पार्थ पवार हे निवडणूक लढवणार नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सांगत असले तरी लोकसभेसाठी मावळमधून त्यांच्याच नावाचा विचार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अग्रक्रमाने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे सुनील तटकरे यांनी याबाबत पक्षाची भूमिका मांडताना सांगितले त्यामुळे मावळ मतदारसंघात पार्थ पवार खासदार बारणे यांच्या समोर उभे राहणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
मावळ मतदारसंघात “पार्थ पवार” निवडणूक लढणार; सुनील तटकरे यांचे संकेत

166 Comments
Oldest