पुणे

फुरसुंगी मधील खुनाचा अवघ्या काही तासात हडपसर पोलिसांकडून उघडकीस … “पूर्वीच्या वादातून धारदार हत्याराने वार करून खून करणाऱ्यांवर गुन्हा दाखल”

पुणे, दि. 16 ः पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून खून करणाऱ्या पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिक कामठे (वय 22), शुभम गायकवाड (वय 21), सोन्या पोटे (वय 22), अनिकेत कटके (वय 20) आणि स्वराज दोरगे (वय 21, सर्व रा. फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वैभव विठ्ठल गायकवाड (वय 22, रा. गायकवाडवाडी, वडकी, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवलिंग ज्ञानदेव पांढरे (वय 20, रा. शिवशंभो पार्क, उरुळी देवाची पोलीस चौकीमागे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी वैभव गायकवाडला 16 जून, 2023 रोजी रात्री दीडच्या सुमारास दुचाकीवरून घेऊन जाते होते. त्यावेळी फुरसुंगीतील परदेशी माळ येथे सुंदरबन सोसायटी रस्त्यावर प्रतिक कामठे, शुभम गायकवाड, सोन्या पोटे, अनिकेत कटके, स्वराज दोरगे यांनी पाठलाग करून वैभव गायकवाड व प्रतिक कामठेवर हत्याराने सपासप वार करून लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये वैभव गायकवाड याचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलीस उपायुक्त विक्रम देशमुख, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, प्रतापसिंह शेळके, सुशील डमरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके करीत आहेत.