पुणेहडपसर

“हडपसरमध्ये दोन्ही पालख्यांमध्ये जनजागृती, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा पुढाकार

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विधी महाविद्यालयाचा उपक्रम

यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी पोलिस प्रशासनाने अतिशय शिस्तबद्ध नियोजन केले होते, परिसरात आजूबाजूला सुंदर रांगोळ्यांचा नयनसदृश देखावा तयार केला होता.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आगमन सकाळी 8.30 वाजता झाले असता यावेळी हजारो भावीक दर्शनासाठी आले होते. यावेळी भाविकांना दर्शन मिळावे आणि सुरक्षित पालखी सोहळा पार पडावा यासाठी पोलिस प्रशासनाने केलेला बंदोबस्त वाखाणण्याजोगा होता.

 

या वर्षीच्या पालखी सोहळ्यासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालयातील कायद्याचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना देखील मदतीसाठी पोलीस मित्र म्हणून माननीय अरविंद गोकुळे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर व दिनेश शिंदे साहेब यांनी सहभागी करून घेतले. या दिंडी सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यां कडून हातात प्लास्टिक बंदी, पाणी वाचवा, इत्यादी नियमांचे पोस्टर्स व बॅनर्स घेऊन जनजागृती करण्यात आली.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना पोलिस प्रशासनाबाबत गौरवोद्गार काढले “आम्हाला मागील दोन दिवसांपासून पोलिसांची असणारी शिस्तीचे दर्शन झाले हडपसर पोलिस चौकीच्या वरीष्ठ आधिकार्यांपासून ते कर्मचार्‍यां पर्यंत रात्री 2 वाजेपर्यंत बैठका चालल्या असताना सकाळी 4 ते 4.30 वाजता चौकीत हजर राहणे, ही कृती पोलिसांच्या शिस्तीच आणि कामाप्रति, समाजाप्रती असणारे प्रेमाच दर्शन घडवते..”

विद्यार्थी मनोगत सांगताना असे म्हणतात, आम्ही पोलिस प्रशासनासोबत गर्दीचे नियोजन, चोरांपासून नागरिकांचे संरक्षण, लहान मुले वृद्ध यांची सुरक्षितता इत्यादी कार्ये पार पाडली त्याचबरोबर गर्दीमधे आम्हाला काही चुकलेली लहान मुले मिळाली आम्ही पोलिसांच्या मदतीने त्यांच्या पालकांचा शोध घेऊन मुलांना त्यांच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचवले त्यावेळी आई-वडील आणि मुले चेहऱ्यावरचा आनंद व समाधान तसेच तेथील जमलेल्या भाविकांचे व वारकऱ्यांचे पालखीच्या दर्शनासाठी असलेले ओढ व प्रेम पाहून पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन साक्षात आम्हाला येथेच मिळाले असे वाटत होते.

आम्ही सध्या तरी कायद्याचे शिक्षण घेत असलो तरी कायद्या प्रमाणे समाज चालावा हे जरी आम्हाला वाटत असले तरी ज्या पद्धतीने वारकरी हजारो वर्ष हा पालखी सोहळा नियमबद्ध शिस्तप्रिय पद्धतीने चालवत आहेत.खरोखरच वारकऱ्यांना तरी कोणत्याही कायद्याची गरज यावेळी लागत नाही त्यांनी ठरवून दिलेले नियम व त्यांच्यातले असलेले अध्यात्मिक प्रेम यावरूनच आपल्याला हे दिसत आहे.

आजपर्यंतचा समाजसेवेचा वारसा यावर्षीही विधी महाविद्यालयाने जोमाने सुरु ठेवला आहे. विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी पथनाट्याद्वारे समाज प्रबोधन, रक्तदान शिबीर तसेच आरोग्य शिबीरांचे आयोजन करत असतात त्याच बरोबर ‘पोलीस मित्राच्या’ भूमिकेतून योगदान अशा विविध माध्यमातून समाजकार्यात अग्रेसर असतात.

पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मिळाली याबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.रंजना पाटील यांनी हडपसर पोलिस प्रशासनाचे आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.