पुणे (प्रतिनीधी)
कोव्हीड 19 रुग्णांची संख्या वाढत असताना बेडसह रक्ताची उणीव जाणवत आहे, प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्पिरिचुअल सोशल चॅरिटेबल फौंडेशनच्या पुणे विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत, अनुयायी व मित्रपरिवार या मोहिमेत सहभागी होणार आहेत.
पुणे शहरात रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे, हे लक्षात घेऊन हडपसर बंटर स्कुल मधील हॉल मध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले आहे, एस.एस.सी.एफ या आध्यात्मिक संस्थेने नोबल हॉस्पिटलच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती हडपसर विभाग प्रमुख रोहीणी भोसले यांनी दिली.
हडपसरचे आमदार चेतन तुपे तुपे पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन होणार असून परिसरातील सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात नागरिकांनी सहभागी व्हावे व रक्तदान करावे जेणेकरून रक्ताचे केलेले संकलन कोव्हीड19 रुग्णांसाठी जीवदान ठरेल अशी माहिती फौंडेशनचे पुणे जिल्हाप्रमुख डॉ.नामदेव पाटील यांनी दिली आहे.
प्लाझ्मा डोनरसाठी नोबल नियोजन करणार
रविवारी आयोजित केलेल्या रक्तानं शिबिरात यादी करण्यात येईल. कोव्हीड 19 रुग्णांना आवश्यक प्लाझ्मा दान साठी आवाहन करण्यात येत आहे, प्लाझ्मा डोनेट साठी नोबल हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करण्यात येईल. अशी माहिती नोबल हॉस्पिटलचे संचालक डॉ.सिद्धराम राऊत यांनी दिली.
रविवारी 13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या रक्तदान शिबिरात सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करण्यात येईल जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.