हडपसर (प्रतिनिधि)
महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाचे गठन करण्याच्या हालचाली सूरू आहेत. अल्पसंख्यांक समाजातील बहुतांशी सर्वच धर्मांना यामध्ये प्रतिनिधित्व दिले जाते.यावेळी ख्रिश्चन समाजाच्यावतीने अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांची निवड करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्रातील ख्रिश्चन समाजाच्या वतीने सरकारकड़े जोर धरत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत असणारे आशिष शिंदे ख्रिश्चन धर्मगुरू जयराज शिंदे यांचे पूञ असून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची समाजाशी नाळ जूळलेली आहे. आशिष शिंदे यांनी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाची स्थापना 2009 साली केली होती व आज संपूर्ण महाराष्ट्रासह सात राज्यात अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या शाखा आहेत.ख्रिश्चन समाजातील अनेक प्रश्नावर जंतर-मंतर, दिल्ली असो की, आझाद मैदान, मुंबई, गांधीनगर गूजरात या ठिकाणी नेहमीच यशस्वी आंदोलने केली व समाज एकञ केला. आज त्यांच्या एका हाकेवर प्रत्येक जिल्ह्यात समाज एकञ होतो. समाजातील हजारो जणांची विवाह जूळविले तर गरजूंची विवाह ही संघटनेच्या माध्यमातून लावून दिले. पूर असो की कोरोना नेहमीच संघटनेच्या माध्यमातून गरजवंताच्या अडचणीत पुढे आले.आज ही पूणे शहरासह महाराष्ट्रातील अनेक शहरात जवळपास 150 कोरोनाने मृत्यू पावलेल्यांचे मोफत अंत्यविधी करणारी एकमेव ख्रिश्चन संघटना म्हणून अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचा उल्लेख आज करावा लागेल.ख्रिश्चन समाजातील सर्वांना सोबत घेवून चालणारी संघटना म्हणून अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचा उल्लेख ख्रिश्चन समाजात होत आहे.आज प्रत्येक जिल्ह्यात अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे जाले चांगले पसरले असून महासंघाचे पदाधिकारी उत्तम प्रकारे कार्य करीत आहेत. महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगावर ख्रिश्चन समाजातून प्रतिनीधी निवडताना त्या व्यक्तीने समाजासाठी केलेल्या कार्याचा संपूर्ण आढावा व त्यांच्या प्रत्यक्ष मूलाखती घेवूनच शासनाने त्यांची नेमणूक करावी.समाजासाठी अविरतपणे झटणारांनाच संधी द्यावी. सर्वांना सोबत घेवून चालणारे व ख्रिश्चन समाजाला दिशा देणारे
आशिष शिंदे यांच्या सारख्या कुशल ख्रिश्चन नेतृत्वाची महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगावर निवड व्हावी अशी मागणी सरकारकड़े ख्रिश्चन महासंघाचे राज्य संघटक नितीन गोर्डे, विल्यम चंदनशीव पुणे,वंदना बेंजामिन नागपूर , डाँ.विवेक पाँल सोलापूर, आनंद म्हाळूंगेकर कोल्हापूर, रायबोर्डे बूलढाणा, राजेश थोरात अहमदनगर, उल्हास भोसले परभणी, सँमसन नांदेड, सुनिल कुमार पूर्णा, डँनिअल ताकवाले औरंगाबाद, राज एडके, मुंबई , रिकी कांबळे जालना, राजू दांडगे वर्धा आदींनी केली आहे.