रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाइन
पुणे (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे राज्य सचिव रोहन रासकर यांनी कोरोनाच्या पार्श्र्वभूमिवर चित्रपट सृष्टीतील पडद्यामागे काम करणारे पाच लाख कारागीर व कामगार यांचा उपासमारीचा प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री महोदय उद्धव ठाकरे साहेब यांना निवेदन देऊन मार्गी लावला. त्यावर मुख्यमंत्री महोदयांनी राज्य सचिव रोहन रासकर यांना मेल करून आपले निवेदन मिळाले आणि पाच लाख कारागीर व कामगार यांची उपासमारीची समस्या सोडविण्यासाठी संबंधित विभागाला आदेश दिले असे सांगीतले.
मुंबई हि चित्रपट सृष्टीची चित्रनगरी म्हणून ओळखली जाते. मुंबई हे हिंदी चित्रपट सृष्टी आणि मराठी चित्रपट सृष्टीचे केंद्रबिंदु आहे. मोठ मोठे चित्रपट स्टुडिओ मुंबई मध्ये असल्या कारनाने देशभरातुन सरासरी पाच लाख कारागीर आणि कामगार वर्ग येथे पडद्यामागे काम करतो. कोरोनाच्या पार्श्र्वभूमिवर सर्व मराठी आणि हिंदी चिंत्रपट सृष्टी सध्या बंद असल्या कारणाने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती हि अतिशय चिंताजनक बाब होती.
राज्य सचिव रोहन रासकर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पाठपुरावा केल्यामुळे त्यांच्या कामाला यश आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक विभागाचे राज्य सचिवाचा पाठपुरावा ; पाच लाख कामगारांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांमार्फत लावला मार्गी
Related tags :
Subscribe
Login
0 Comments