कलाशिक्षक जगदीश कुंभार यांची राज्य प्रशिक्षणासाठी निवड

Rokhthok Maharashtra 22 0

भारती विद्यापीठाची सौ. विजयमाला कदम कन्या प्रशाला एरंडवणे पुणे येथील कलाशिक्षक श्री. जगदीश तानाजी कुंभार यांची नवीन शैक्षणिक धोरण पुनर्रचित अभ्यासक्रम, इयत्ता सहावी , विषय कलाशिक्षण साठी लोणावळा , जिल्हा पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सुलभक प्रशिक्षण कार्यशाळेसाठी निवड झाली आहे . जगदीश कुंभार हे भारती विद्यापीठ या संस्थेत गेली 26 वर्ष कलाशिक्षक म्हणून कार्यरत असून शाळेतील एलिमेंट्री व इंटरमिजिएट या चित्रकला ग्रेड परीक्षेत उत्तम असे यश संपादन करण्यासाठी त्यांचा हातखंडा आहे .नाट्य चित्रकला,शिल्प, चित्रपट , गीत,अभिनय, अशा विविध कला क्षेत्रात पारंगत आहेत, या त्यांच्या कौशल्यानुसार त्यांची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी त्यांची सार्थ निवड केली आहे . भारती विद्यापीठ शालेय समितीच्या अध्यक्षा मा. विजयमाला कदम तसेच भारती विद्यापीठ शालेय शिक्षण विभागाचे संचालक श्री. एम. डी. कदम सर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना कोळी यांनी त्यांचे अभिनंदन केले. परिसरातील पालक वर्ग, शिक्षक सहकारी व विद्यार्थी यांच्याकडून श्री कुंभार सर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.