पारगावात बिबट्याचा धुमाकूळ! 120 गावरान कोंबड्या फस्त, ग्रामस्थांमध्ये भीती

Rokhthok Maharashtra 1 0

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पारगाव परिसरात बिबट्याचा थरार पाहायला मिळाला आहे. ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट गोठ्यात घुसून गावरान कोंबड्यांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कांताबाई मिंडे यांच्या गोठ्यातील खुराड्यात तब्बल १५० गावरान कोंबड्या होत्या. मात्र बिबट्याने लोखंडी जाळी उचकटून आत प्रवेश केला आणि कोंबड्यांवर हल्ला चढवला.
या हल्ल्यात सुमारे १२० कोंबड्या मृत झाल्याने शेतकऱ्यांचे ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
वन विभागाने घटनास्थळी पंचनामा केला असून बिबट्याचे ठसेही आढळून आले आहेत. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.