पुणे

चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा गळा दाबून केला खून!

पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिंचवडच्या विद्यानगर परिसरात चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
ही घटना २८ जून रोजी दुपारी एक ते दोन वाजण्याच्या सुमारास विद्यानगरमधील राहत्या घरी घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी नागनाथ दत्तू कांबळे याने पत्नी वैशाली कांबळे हिच्यावर चारित्र्याचा संशय घेत तिचा गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी मृत महिलेच्या मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानंतर भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.