पुणेमहाराष्ट्र

प्रतिबंधित ई-सिगारेट व हुक्का फ्लेवरची ऑनलाईन विक्री करणा-या इसमास केले जेरबंद

पुणे – विमानतळ पोलीस स्टेशनचे हद्दीत ऑनलाईन बेकायदेशीरपणे ई-सिगारेट व हुक्का फ्लेवरची विक्री होत असले बाबतची बातमी पोलीस अंमलदार हरीप्रसाद पुंडे यांना मिळाली होती. सदर बातमीच्या अनुषंगाने दिनांक ३०/०६/२०२६ रोजी एका बनावट ग्राहकामार्फत ऑनलाईन हुक्का फ्लवेरची ऑर्डर देण्यात आली होती. त्यानंतर सीसीडी चौक, कोनार्कनगर सोसायटीचे जवळ विमाननगर पुणे येथे सापळा लावुन पोर्टरद्वारे डिलीव्हरी देणारे इसमास ताब्यात घेतले. त्यावेळी पोर्टरवरील पार्सलमध्ये १८,३२०/-रु.किं. चे प्रतिबंधित हुक्का फ्लेवर जप्त करण्यात आले. पोर्टर डिलीव्हरी बॉय याचेकडे चौकशी करुन त्याने पार्सल आणले त्याठिकाणी विमानतळ पोलीस स्टेशनचे तपास पथक प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड व तपास पथकातील स्टाफसह शिशा कॉर्नर, शॉप नंबर ५, कड नगरचौक, एनआयबीएम रोड, एचडीएफसी बँक हिल्स अॅन्ड डेल्स मोहम्मदवाडी पुणे या शॉपवर छापा मारला असता, सदर ठिकाणी १) असद चांदमिया बरभैया वय ३१ वर्ष रा. बैगदीनगर कोंढवा पुणे २) विकास रमेश बागुल वय ३३ वर्ष रा. मोहम्मदवाडी पुणे यांना ताब्यात घेवुन नमुद शॉपचे झडतीमध्ये एकुण १,२४,३७०/-रु.किं.चे प्रतिबंधित हुक्का फ्लेवर, ई सिगारेट व संबंधित इतर साहीत्य मिळुन आले असुन, सर्व साहित्य जप्त करण्यात आलेले आहे. अशा प्रकारे एकुण १,४२,६९०/-रु.किं.चे प्रतिबंधित हुक्का फ्लेवर, ई सिगारेट व संबंधित इतर साहीत्य जप्त करण्यात आलेले आहे. नमुद इसमांचे विरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.३१७/२०२६ इलेक्ट्रॉनिक सिगारेट उत्पादन आयात निर्यात वाहतुक विक्री साठवणुक व जाहिरात प्रतिबंध अधिनियम २०१९ चेकलम ७ च ८ सिगारेट व तंबाखुजन्य इतर उत्पादने (जाहिरात प्रतिबंद आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनीयमन) अधिनियम, २००३ व २००४ चे कलम ७(२),२०

(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ-०७ पुणे शहर श्री. अबिनाश कुमार मा. सहा. पोलीस आयुक्त, खराडी विभाग पुणे शहर श्री. सुनिल दोरगे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ श्री. गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. महेश बोलके, यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार हरीप्रसाद पुंडे, लालु कन्हे, राहुल जोशी, रुपेश पिसाळ, योगेश थोपटे, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण, दिगंबर गोरे, राजीव टोंम्पे, प्रशांत सुतार, अंकुश जोगदंडे, आशा धादवड व सना शेख यांचे पथकाने केली आहे.