कोठडीतील मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना जन्मठेप! 15 वर्षांनंतर न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

Rokhthok Maharashtra 15 0

महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ उडवणारा एक ऐतिहासिक निकाल वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आहे.
2011 मध्ये रिसोड पोलीस ठाण्यात कोठडीत असताना बेग्या पवार यांचा झालेल्या मृत्यू प्रकरणात न्यायालयाने तत्कालीन ठाणेदारासह 9 पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
तपासात कोठडीत अमानुष मारहाण झाल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने खून, कबुली मिळवण्यासाठी छळ आणि इतर गंभीर गुन्ह्यांच्या कलमांखाली सर्व आरोपींना दोषी ठरवले.
या प्रकरणाचा तपास सीआयडीने केला होता. तब्बल 15 वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर हा निकाल लागला असून, मृत बेग्या पवार यांच्या कुटुंबीयांनी न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे.
या निर्णयामुळे पोलीस कोठडीतील आरोपींच्या सुरक्षिततेचा आणि कायद्याच्या राज्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.