पुण्यात खळबळ! ₹2 हजारांच्या खंडणीप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा

Rokhthok Maharashtra 34 0

पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर खंडणीचा गंभीर आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे.
बुधवार पेठ परिसरात दोन तरुणांना गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून ₹2 हजारांची खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित महिलेच्या स्कॅनरवरून ऑनलाइन पैसे घेतल्याचा दावा करण्यात आला असून, या व्यवहाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
या प्रकरणी विवेक पाटील आणि राहुल दाभाडे या फरासखाना पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा नोंद झाल्यानंतर दोन्ही कर्मचारी फरार असल्याची माहिती समोर आली असून, त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.