लोणावळ्यात रात्री प्रवेशबंदी! धबधबे, किल्ले आणि पवना धरणावर मोठे निर्बंध

Rokhthok Maharashtra 23 0

पावसाळ्यातील वाढती गर्दी आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर लोणावळा परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ अंतर्गत महत्त्वाचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
६ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पवना धरण, भाजे धबधबा, लोहगड, विसापूर, तिकोणा, तुंग किल्ला, टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट येथे प्रवेशावर निर्बंध असतील.धबधब्यात उतरणे, पाण्यात पोहणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे, मद्यपान, कचरा टाकणे, मोठ्या आवाजात डीजे वाजवणे आणि बेदरकार वाहनचालना यावरही बंदी घालण्यात आली आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला असून, पर्यटकांनी सुरक्षिततेसाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.