मोठी बातमी! फडणवीसांचा कंपन्यांना इशारा; कर्मचाऱ्यांना द्या Work From Home

Rokhthok Maharashtra 1 0

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, हवामान विभागाने ८ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्कालीन यंत्रणांना २४ तास युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत खासगी कंपन्या आणि आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना शक्य असेल तेथे ‘वर्क फ्रॉम होम’ ची सुविधा द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी इशारा देत म्हटले आहे की, सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून कर्मचाऱ्यांना विनाकारण कार्यालयात बोलावणाऱ्या कंपन्यांविरुद्ध आवश्यक त्या कायदेशीर तरतुदींनुसार कडक कारवाई केली जाईल.
दरम्यान, पावसामुळे राज्यातील अनेक भागांत रस्ते, रेल्वे आणि वाहतुकीवर परिणाम झाला असून, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.