लुडो जिंकला… पण आयुष्य हरला! अमरावतीत तरुणाची चाकूने भोसकून हत्या

Rokhthok Maharashtra 24 0

अमरावतीत लुडोच्या खेळानंतर झालेल्या वादातून एका २८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मृत तरुणाचे नाव जाहीद हुसेन रिफाकत हुसेन असे असून, शनिवारी रात्री तो मित्रांसोबत कॅम्प परिसरातील एका ठिकाणी लुडो खेळत होता. खेळ जिंकल्यानंतर आनंद साजरा करत असताना काही कारणावरून वाद झाला.
या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी जाहीदचा पाठलाग करत त्याच्यावर चाकूने वार केल्याचा आरोप आहे.
गंभीर जखमी झालेल्या जाहीदला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी गोलू ऊर्फ शेख इम्रान, शेख अमीन आणि शेख समीर या तिघांना पोलिसांनी अटक केली असून, हत्येमागील नेमके कारण काय, याचा तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.