पुणे

युथ आयकॉन अमित अण्णा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बॉक्स क्रिकेटचा जल्लोष! 48 संघांचा विक्रमी सहभाग

युथ आयकॉन अमित अण्णा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शेवाळेवाडी–मांजरी सोसायटी प्रीमियर लीग २०२६ बॉक्स क्रिकेट स्पर्धेला खेळाडू व क्रिकेटप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन दिवसीय स्पर्धा अस्पायर स्पोर्ट्स क्लब, शेवाळेवाडी, पुणे येथे ही स्पर्धा मोठ्या जल्लोषात व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. स्पर्धेत तब्बल ४८ संघांनी सहभाग नोंदवत स्पर्धेची रंगत आणखी वाढवली.

स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला मांजरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांनी विशेष उपस्थिती लावली. तसेच नगरसेवक गणेश कामठे, विक्रम दादा शेवाळे, अशोक तात्या शेवाळे, राहुल शेवाळे, निलेश पवार, संदीप दादा शेवाळे, भुजंग शेवाळे बाळासाहेब भंडारी, छायाताई गदादे, सीमाताई शेंडे, निशाताई थोरात यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेतील आणखी एक आकर्षण म्हणजे डान्सिंग अंपायर एस. पी. गोविंदा यांची अनोखी आणि मनोरंजक अंपायरिंग. त्यांच्या हटके शैलीमुळे प्रत्येक सामना अधिक रोमांचक आणि प्रेक्षकांसाठी संस्मरणीय ठरला.

यंदा स्पर्धेचे दुसरे वर्ष असून, यावर्षीही खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवले. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात श्रीरामनगर वॉरियर्स संघाने विजेतेपद पटकावले, तर टीम स्ट्रायकर्स (शिवचैतन्य कॉलनी) संघाने उपविजेतेपद मिळवले.

विजेत्या श्रीरामनगर वॉरियर्स संघाचे कर्णधार गणेश ईवरे यांच्या नेतृत्वाखाली गणेश ईवरे (कर्णधार), पायल ईवरे, ओंकार बारवकर, प्रज्वल हिरवे, ऋषिकेश सुपेकर, रंजीत वीर, ऋतिक सुतार आणि उत्कर्ष इनामदार या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपदावर मोहोर उमटवली.

उपविजेत्या टीम स्ट्रायकर्स (शिवचैतन्य कॉलनी) संघाचे कर्णधार वेदांत कामठे यांच्या नेतृत्वाखाली वेदांत कामठे (कर्णधार), अंजली कामठे, रोहन जाधव, भुवन जाधव, तनमय बारकुंड, स्वरूप गाढवे आणि गणेश राऊत यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीपर्यंत दमदार मजल मारत उपविजेतेपद पटकावले.

स्पर्धेदरम्यान पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडी अध्यक्षा ममता ताई शिवतारे यांनी स्पर्धेला सदिच्छा भेट देत संपूर्ण आयोजनाची पाहणी केली. त्यांनी स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाचे आणि शिस्तबद्ध आयोजनाचे तोंडभरून कौतुक करत अमित अण्णा पवार यांना भविष्यातही युवकांना एकत्र आणणारे आणि समाजोपयोगी उपक्रम अशाच उत्साहाने राबविण्याचे आवाहन केले.

यावेळी आमदार विजय (बापू) शिवतारे यांनी दूरध्वनीद्वारे आयोजक व सर्व खेळाडूंशी संवाद साधत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. युवकांमध्ये खेळाची आवड, संघभावना आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणारे असे उपक्रम सातत्याने होत राहावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

स्पर्धेदरम्यान प्रत्येक सामन्यासाठी ‘मॅन ऑफ द मॅच’, उत्कृष्ट महिला खेळाडू, तसेच विविध वैयक्तिक आणि सांघिक कामगिरीसाठी विशेष चषक व पुरस्कार प्रदान करण्यात आले. वुमन ऑफ द सिरीज हा मान पायल ईवरे हिने पटकावला, तर मालिकावीर हा बहुमान रोहन जाधव याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर मिळवला. विजेत्या व उपविजेत्या संघांसह सर्व उत्कृष्ट खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
स्पर्धेचे आयोजक अमित पवार यांनी सांगितले की, “तरुणांमध्ये खेळाची आवड, संघभावना, बंधुभाव आणि परस्पर प्रेमाची भावना अधिक दृढ व्हावी, तसेच निरोगी स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. खेळाडू, प्रेक्षक, मान्यवर आणि सर्व सहकाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. भविष्यातही अशाच भव्य स्वरूपात ही स्पर्धा आयोजित करण्याचा आमचा मानस आहे.”