कल्याणमध्ये थरारक हत्याकांड! बंद फ्लॅटमध्ये गोणीत तुकडे केलेला मृतदेह, महिला बेपत्ता

Rokhthok Maharashtra 10 0

कल्याणमध्ये अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. अनेक दिवसांपासून फ्लॅटमधून दुर्गंधी येत होती. पोलिसांनी दार उघडताच आतलं दृश्य पाहून सर्वजण हादरले.

कल्याण पूर्वेतील अडवली-ढोकळी परिसरातील नीलकंठ सोसायटीतील एका बंद फ्लॅटमध्ये गोणीत भरलेला एका पुरुषाचा मृतदेह आढळला. प्राथमिक तपासात मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. परिसरातून अनेक दिवस दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी मानपाडा पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी फ्लॅटची पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार उघड झाला. मृत व्यक्ती एका महिलेसोबत राहत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ती महिला सध्या बेपत्ता असून तिचा शोध सुरू आहे.
फॉरेन्सिक पथकाने पुरावे गोळा केले असून, सीसीटीव्ही, कॉल रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक बाबींचा तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.