समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रकने कार चिरडली, 6 जणांचा जागीच मृत्यू | Wardha
समृद्धी महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील विरूळ इंटरचेंजजवळ हा हृदयद्रावक अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यावरून मुलीचे अॅडमिशन करून नागपूरकडे जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला मागून भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यावेळी महामार्गावर आधी झालेल्या इथेनॉल टँकरच्या अपघातामुळे वाहतूक थांबलेली होती. धडक इतकी भीषण होती की कार ट्रकखाली चिरडली गेली, तर मिरचीने भरलेल्या ट्रकला आग लागली. या दुर्घटनेत कारमधील चौघे आणि ट्रकमधील चालक व क्लीनरसह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.





