MPSC सचिवांच्या तोंडाला काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक!

Rokhthok Maharashtra 5 0

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले आहे. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी आक्रमक भूमिका घेत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ही कारवाई केली.
संघटनेचे प्रदेश प्रवक्ता ॲड. संतोष शिंदे यांनी यावेळी आक्रमक प्रतिक्रिया देत, “हा केवळ एका अधिकाऱ्याचा नाही, तर भ्रष्ट व्यवस्था आणि नालायक सरकारच्या तोंडाला फासलेले काळे आहे,” असं म्हटलं आहे.
३ ऑगस्ट रोजी अध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी दिलेल्या इशाऱ्याची ही अंमलबजावणी असल्याचं संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आलं आहे.
एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी तातडीने राजीनामा न दिल्यास यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
या आंदोलनात मुख्य भूमिका बजावणारे उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत आणि सुहास राणे यांच्या पाठीशी संघटना खंबीरपणे उभी असल्याचंही ॲड. संतोष शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.