पुण्यात अवैध हातभट्टी दारू विक्रीवर पोलिसांचा बडगा! महिलेला MPDA अंतर्गत कारवाई

Rokhthok Maharashtra 18 0

पुण्यात अवैध हातभट्टी दारू विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे! वारंवार कायदेशीर कारवाई करूनही अवैध व्यवसाय सुरू ठेवल्याचा आरोप असलेल्या निकिता रणधीर बिरे या महिलेला एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्ध करण्यात आले आहे. तिला कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता बिरे ही वारजे माळवाडी परिसरातील विठ्ठलनगर येथे राहते. तिच्याविरुद्ध यापूर्वी वारजे माळवाडी पोलिसांकडून अनेकदा कारवाई करण्यात आली होती. मात्र, तरीही अवैध हातभट्टी दारू विक्री सुरू असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार, या प्रकरणात एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करण्यात आला. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, तर २२ ऑक्टोबर रोजी महिलेला ताब्यात घेऊन कारागृहात रवानगी करण्यात आली.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे आणि सुवर्णा हुलवान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, मनोज साळुंखे, पोलीस अंमलदार विजय खिलारी, अमोल सुतकर, महादेव शिंदे, योगेश वाघ, बालाजी काटे, निखिल तांगडे, शरद पोळ, अमित जाधव, अमित शेलार, सागर कुंभार, तसेच महिला पोलीस अंमलदार अंकिता मोहोळ आणि अश्विनी धोत्रे यांनी सहभाग घेतला.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.