Sick Leave घेऊन गांजा तस्करी! पुण्याच्या पोलीसाला तेलंगणात अटक; १२ किलो गांजा जप्त
Sick Leave घेऊन गांजा तस्करी! पुण्याच्या पोलीस अंमलदाराचं कांड; १२ किलो गांजासह तेलंगणात अटक!
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे! वैद्यकीय रजेवर असताना पुणे शहर वाहतूक विभागातील एका पोलीस अंमलदाराला चक्क गांजा तस्करी करताना तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे.
नितीन ज्ञानू शिंदे असं या पोलीस अंमलदाराचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन शिंदे हे ७ ऑक्टोबरपासून वैद्यकीय रजेवर होते. दरम्यान, २५ ऑक्टोबर रोजी तेलंगणातील वरंगल जिल्ह्यात रेल्वेने प्रवास करत असताना नेक्कोंडा पोलिसांनी त्यांना संशयावरून ताब्यात घेतलं. त्यांच्या सामानाची झडती घेतली असता तब्बल १२ किलो गांजा आढळून आला.
यानंतर पोलिसांनी गांजा जप्त करून त्यांच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार म्हणजेच NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत पुणे शहर वाहतूक विभागाने नितीन शिंदे यांना तातडीने निलंबित केलं आहे.
मात्र, आता या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? वैद्यकीय रजेच्या काळात नेमकं काय घडलं? या प्रश्नांची उत्तरं तपासातून समोर येणार आहेत.
खाकी वर्दीतील या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, पुढील तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.





