मंत्री कार्यालयातील 550 कर्मचाऱ्यांची हाकलपट्टी! CM फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर

Rokhthok Maharashtra 9 0

मंत्री कार्यालयातील ५५० कर्मचाऱ्यांची हाकलपट्टी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर!
मंत्रालयातील मंत्री कार्यालयांमध्ये बाह्यस्त्रोत, उसनवारी आणि मौखिक पद्धतीने कार्यरत असलेल्या तब्बल ५५० कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात परत पाठवण्यात आलं आहे.
नवीन मंत्री आपल्या कार्यालयातील कामकाजासाठी अनेकदा दुसऱ्या विभागातील कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करत होते. मात्र, अशा काही नियुक्त्या नियमबाह्य पद्धतीने झाल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाच्या निदर्शनास आलं.
यानंतर सामान्य प्रशासन विभागाने अशा कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतण्याचे निर्देश दिले होते. अन्यथा वेतन रोखण्याची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
अखेर तब्बल ५५० कर्मचारी आपल्या मूळ विभागात परतले आहेत.
या निर्णयामुळे मंत्री कार्यालयांमध्ये मात्र नाराजी असल्याची चर्चा आहे. कारण मंत्र्यांच्या विश्वासातील कर्मचारी त्यांच्या कार्यालयातून हटवले गेले आहेत.
यापुढे मंत्री कार्यालयात नवीन कर्मचारी नियुक्त करताना त्यांच्या नियुक्तीची पडताळणी मुख्यमंत्री कार्यालयाकडून होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
त्यामुळे आता सवाल असा—
मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारी नियुक्त्यांवर मुख्यमंत्री कार्यालयाचं नियंत्रण वाढणार का?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयामुळे मंत्रालयातील प्रशासनात मोठा बदल होण्याची चिन्हं दिसत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.