जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तावर नोकरी घोटाळ्याचा गुन्हा!

Rokhthok Maharashtra 10 0

पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जेजुरी देवस्थानचे राजेंद्र खेडेकर आणि त्यांच्या साथीदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, पुणे महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत आरोपींनी सुशिक्षित बेरोजगारांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात बनावट लेटरहेड, बनावट शिक्के आणि खोटी कागदपत्रे वापरून सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या तक्रारीच्या आधारे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात राजेंद्र खेडेकर आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
नोकरीच्या आमिषाने होणाऱ्या अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.