धक्कादायक! शाळेच्या पोषण आहारात अळ्या; विद्यार्थ्यांनी जेवणच थांबवलं

Rokhthok Maharashtra 25 0

धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अळ्या आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे पालक आणि ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पारा येथे विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सोयाबीन भातात अळ्या आढळल्याचा प्रकार उघडकीस आला.विद्यार्थ्यांना जेवण वाढल्यानंतर हा प्रकार लक्षात येताच त्यांनी जेवण थांबवले. या घटनेनंतर शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने रात्री उशिरा शाळेत भेट देऊन पोषण आहाराचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.
या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषींवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.