₹38 हजारांची नोकरी सोडली, चहाच्या टपरीतून महिन्याला ₹1 लाख नफा? व्हायरल यशोगाथा!

Rokhthok Maharashtra 39 0

दरमहा ३८ हजार रुपयांची कॉर्पोरेट नोकरी सोडून एका तरुणाने घेतलेला निर्णय आज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. चहाच्या छोट्याशा टपरीने त्याचे नशीबच पालटल्याचा दावा व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
व्हायरल माहितीनुसार, संबंधित तरुणाने पगारवाढ कमी आणि वाढत्या खर्चामुळे नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर सुमारे २ लाख रुपयांची गुंतवणूक करून गजबजलेल्या ऑटो स्टँडजवळ चहाची टपरी सुरू केली.दुकानाचा आकर्षक लुक, परवडणाऱ्या किमती आणि चांगली सेवा यामुळे ग्राहकांची मोठी गर्दी होऊ लागली. पोस्टनुसार, दररोज सुमारे ४०० कप चहा विक्री होत असून रोजची विक्री जवळपास ६ हजार रुपये आहे.
सर्व खर्च वजा केल्यानंतर दरमहा सुमारे १ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.