वाघोली हादरली! सोशल मीडियातून ओळख, तरुणीवर कथित अत्याचार; चौघांविरोधात गुन्हा

Rokhthok Maharashtra 27 0

पुण्यातील वाघोली परिसरातून महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका तरुणीवर कथित लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २०२४ मध्ये महाविद्यालयात शिक्षण घेत असताना पीडित तरुणीची फरहान शेख याच्याशी ओळख झाली. नोव्हेंबर २०२५ मध्ये आरोपीने तिला वाघोलीतील एका खासगी वसतिगृहात बोलावून तिच्यावर कथित अत्याचार केला. त्यानंतर वाघोली, खराडी आणि विमाननगर येथे नेऊन त्याच्या इतर मित्रांनीही तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आरोपीने आक्षेपार्ह छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिला वारंवार धमकावले.
या प्रकरणी वाघोली पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक पल्लवी मेहेर करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.