माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात अभिवादन

Rokhthok Maharashtra 27 0

दादांच्या आठवणीने धनंजय मुंडे, आदिती तटकरेंसह उपस्थित सर्वच भावूक…

दादांचा जन्मदिवस जयंती म्हणून साजरा करावा लागतोय या विचारानेच सर्वांच्या डोळ्यात अश्रू…

मुंबई, दि.२२ जुलै – माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री धनंजय मुंडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे ,सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार शिवाजीराव गर्जे यांनी त्यांच्या प्रतिमेसमोर पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

दादांच्या आठवणीने धनंजय मुंडे, आदिती तटकरेंसह उपस्थित सर्वच भावूक झाले तर दादांचा जन्मदिवस जयंती म्हणून साजरा करावा लागतोय या विचारानेच सर्वांच्या डोळ्यात अश्रू यावेळी पहायला मिळाले.

जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईसह राज्यातील व कर्नाटकातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.