लोकनेते दिवंगत अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन.

Rokhthok Maharashtra 27 0

लोकनेते दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त स्मृतीस्थळी अभिवादन; खासदार पार्थ पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांची उपस्थिती

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार श्री. पार्थ अजितदादा पवार यांनी लोकनेते दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळी जाऊन भावपूर्ण अभिवादन केले.

यावेळी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार, श्री. जय पवार तसेच पवार परिवारातील सदस्य उपस्थित होते. सर्वांनी लोकनेते दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण करून विनम्र आदरांजली वाहिली.

याप्रसंगी उपस्थितांनी अजितदादा पवार यांनी जनसेवा, विकास आणि लोककल्याणासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करत त्यांच्या कार्याला अभिवादन केले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.