पिंपळसूटी येथे 5 वर्षीय भाग्यश्री वारे हिचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू.

Rokhthok Maharashtra 3 0

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. पिंपळसूटी येथील फलके मळा परिसरात मध्यरात्री बिबट्याच्या हल्ल्यात भाग्यश्री संदीप वारे या अवघ्या 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री ही आई-वडिलांसोबत गोठ्यात झोपलेली असताना पहाटे सुमारे 2.45 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने तिच्यावर हल्ला करून तिला ओढत उसाच्या शेतात नेले. आई-वडिलांनी आरडाओरडा केला, मात्र बिबट्या पसार झाला. वनविभाग आणि ग्रामस्थांनी शोध घेतल्यानंतर घरापासून सुमारे 50 मीटर अंतरावर भाग्यश्रीचा मृतदेह आढळून आला.
या परिसरात यापूर्वीही रक्षा अजय निकम या 4 वर्षीय चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे संतप्त नागरिकांनी तातडीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सर्च ऑपरेशन आणि पिंजरे लावण्याची मागणी केली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.