‘वेलकम हॉटेल’मध्ये बोलावलं अन् केला खून? विभक्त नवऱ्याची निर्घृण हत्या, पत्नी आणि माम्यावर संशय

Rokhthok Maharashtra 7 0

“चार वर्षांपासून विभक्त राहणाऱ्या पतीला पत्नीने ‘वेलकम हॉटेल’मध्ये भेटायला बोलावलं… पण ही भेट त्याच्या आयुष्यातील शेवटची ठरली. छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे.
जाबीर शेख नावाच्या व्यक्तीची हॉटेलच्या रूममध्ये निर्घृण हत्या झाल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, पत्नी शबाना आणि तिच्या माम्यावर संशय व्यक्त करण्यात आला असून दोघांचा शोध सुरू आहे.
दोघे अनेक वर्षांपासून विभक्त राहत होते. चर्चेच्या बहाण्याने हॉटेलमध्ये बोलावण्यात आल्यानंतर नेमकं काय घडलं? हत्या का करण्यात आली? यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.