भोजपुरी अभिनेता रोहित शर्मा यांचा भीषण अपघातात मृत्यू; भरधाव ट्रकने चिरडलं, चाहत्यांमध्ये शोक
“भोजपुरी चित्रपटसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक रोहित शर्मा यांचे भीषण रस्ता अपघातात निधन झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या शूटिंगवरून परतत असताना चुकीच्या बाजूने भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रोहित शर्मा गंभीर जखमी झाले, तर त्यांच्यासोबत असलेला मित्रही गंभीर जखमी झाला आहे.
दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी रोहित शर्मा यांना मृत घोषित केले. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी ट्रकची ओळख पटवून चालकाचा शोध सुरू केला आहे.
रोहित शर्मा यांच्या आकस्मिक निधनाने भोजपुरी मनोरंजनसृष्टी आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.





