खलील शेख आत्महत्या प्रकरणात मोठी घडामोड! रवींद्र धंगेकर दाम्पत्याला अटकपूर्व जामीन.

Rokhthok Maharashtra 39 0

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांना सत्र न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणात धंगेकर दाम्पत्यासह 13 ते 14 जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खलील शेख यांनी मृत्यूपूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करत बांधकाम प्रकल्पातील थकीत बिलांमुळे आर्थिक अडचणीत आल्याचा आरोप केला होता.
धंगेकर यांच्या वतीने न्यायालयात असा युक्तिवाद करण्यात आला की, त्यांना या प्रकरणात विनाकारण ओढण्यात आले असून त्यांच्या विरोधात ठोस पुरावे नाहीत. यानंतर न्यायालयाने त्यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.
मात्र, या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून उल्लेख असलेल्या बाळा शेंडगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून आरोपांबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.