दिवे घाट परिसरात धक्कादायक घटना! टपरीजवळ झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावरून कार गेल्याने त्याचा मृत्यू

Rokhthok Maharashtra 28 0

पुण्यातील दिवे घाट परिसरात दुर्दैवी अपघात, झोपलेल्या व्यक्तीचा कारखाली चिरडून मृत्यू
दिवे घाटाच्या पायथ्याशी आंबेकर लॉन्ससमोरील टपरीजवळ एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला आहे. रविवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावरून कारचे पुढील चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी कारचालक चंदनकुमार गिरीजाशंकर गौतम (वय 31, रा. जेजुरी, ता. पुरंदर) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनाखाली किंवा समोर कोणती व्यक्ती आहे का याची खात्री न करता चालकाने निष्काळजीपणे कार पुढे नेली. त्यामुळे कारचे पुढील चाक झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावरून गेले आणि त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोमल जाधव करत आहेत. निष्काळजी वाहनचालकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी वाहन चालवताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.