मोबाईलच्या बॅटरीशी खेळणे ठरले जीवघेणे; तेलंगणात 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू.

Rokhthok Maharashtra 51 0

तेलंगणातील कोमुरम भीम आसिफाबाद जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. मोबाईलच्या बॅटरीशी खेळताना झालेल्या स्फोटात 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुडेम गावातील इयत्ता आठवीत शिकणारा लोकेश हा पावसामुळे शाळेत गेला नव्हता. दुपारच्या सुमारास घरात खेळत असताना त्याने मोबाईलची बॅटरी तोंडात धरून दाताने चावली. त्याचवेळी बॅटरीचा अचानक स्फोट झाला.
या अपघातात मुलगा गंभीर जखमी झाला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मोबाईलच्या बॅटऱ्या आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे लहान मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.