जिल्हा परिषदेच्या सभेत गोंधळ; सदस्यावर लग्नाचे आमिष दाखवून फसवणुकीचा आरोप.

Rokhthok Maharashtra 6 0

जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून फसवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत.
बारामतीतील भाग्यश्री धायगुडे यांनी जिल्हा परिषदेच्या सभेदरम्यान आंदोलन करत मंगेश जगताप यांच्यावर अनेक वर्षे लग्नाचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान सोमवारी मोठा गोंधळ उडाला. एका महिलेने सभागृहात तीव्र आंदोलन करण्याचा प्रयत्न केला
घटनेदरम्यान पोलिस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर संबंधित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना भाग्यश्री धायगुडे यांनी कॉलेजपासून प्रेमसंबंध असल्याचा आणि लग्नाचे आश्वासन देण्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र, नंतर लग्न टाळण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत मंगेश जगताप यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. पोलिस या संपूर्ण घटनेचा तसेच सभागृहातील सुरक्षा व्यवस्थेचा तपास करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमके सत्य स्पष्ट होणार आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.