मोठ्या अपघाताची वाट पाहताय का? पावसाळ्यात धोकादायक स्थितीतील विद्युत केबल्समुळे नागरिकांमध्ये भीती.

Rokhthok Maharashtra 36 0

पुण्यातील कोरेगाव पार्क–मुंढवा रोडवरील रस्ता रुंदीकरणाच्या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते तुषार भाऊ जाधव यांनी याबाबत गंभीर इशारा देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
कोरेगाव पार्क–मुंढवा रोडवर गेल्या जवळपास एका वर्षापासून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, पूनावाला फिनकॉर्प परिसरात महावितरणचा डीपी आणि मोठ्या विद्युत केबल्स अजूनही रस्त्याच्या कडेला धोकादायक स्थितीत असल्याचे दिसून येत आहे.
या मार्गावर दररोज हजारो नागरिक, दुचाकीस्वार आणि पादचारी ये-जा करतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या उघड्या विद्युत यंत्रणेमुळे अपघात किंवा विजेचा धक्का लागण्याचा धोका अधिक वाढला आहे.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते तुषार भाऊ जाधव यांनी महावितरण, पुणे महानगरपालिका आणि संबंधित ठेकेदारांनी तातडीने दखल घेऊन डीपी आणि विद्युत केबल सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित कराव्यात, अशी मागणी केली आहे. मोठा अपघात घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांचीही मागणी आहे.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.