ताथवड्यात दोन अल्पवयीन बहिणींवरील कथित लैंगिक अत्याचारप्रकरणी संशयित ताब्यात.

Rokhthok Maharashtra 42 0

पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे परिसरातून दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींवरील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ताथवडे परिसरात शेजारी राहणाऱ्या ५५ ते ६० वर्षीय व्यक्तीवर ४ वर्षे आणि १० वर्षांच्या दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
या घटनेची माहिती समोर येताच परिसरात संताप व्यक्त करण्यात आला. वाकड पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित रमजान बागवान याला ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणात पोक्सो आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.