मुंढेंचा मोठा दणका! 5 नामांकित क्लबचे FSSAI लायसन्स रद्द झुरळं, माशा अन् एक्सपायर अन्न!

Rokhthok Maharashtra 9 0

मुंबईतील नामांकित क्रीडा क्लबांवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या तपासणीत क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, आरके जुहू जिमखाना, अपर्णा जुहू जिमखाना, एमआयजी क्रिकेट क्लब आणि विलिंग्डन स्पोर्ट्स क्लबमध्ये गंभीर अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळले.
तपासणीत स्वयंपाकघरात झुरळं आणि माशांचा प्रादुर्भाव, अस्वच्छ परिसर, एक्सपायर अन्नपदार्थ आणि चुकीची साठवणूक उघड झाली. त्यामुळे या क्लबचे FSSAI परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत.
याशिवाय एमआयजी क्रिकेट क्लबमध्ये वैध परवान्याशिवाय केटरिंग सुरू असल्याचे, तर गोरेगाव स्पोर्ट्स क्लबला परवान्याशिवाय व्यवसाय सुरू असल्यामुळे स्टॉप बिझनेस नोटीस बजावण्यात आली आहे.
२४ ते २७ जुलैदरम्यान राज्यभरातील ८१ हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब आणि धाब्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ११ परवाने निलंबित करण्यात आले असून १२ आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.