कराडमध्ये विशेष नाकाबंदी! दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या १२ चालकांवर गुन्हे

Rokhthok Maharashtra 5 0

कराडमध्ये वाहतूक पोलिसांची विशेष नाकाबंदी… दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या तब्बल १२ चालकांवर गुन्हे दाखल, तर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या आणखी दोघांवर कारवाई करण्यात आली आहे!
कराड शहरातील अपघात रोखण्यासाठी आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने कृष्णा कॅनॉल, कोल्हापूर नाका येथे विशेष नाकाबंदी मोहीम राबवण्यात आली.
या कारवाईदरम्यान वाहनचालकांची ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात आली. यामध्ये मद्यप्राशन करून वाहन चालवणारे १२ चालक आढळल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या २ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. नियमबाह्य ब्लॅक फिल्म लावलेल्या २ चारचाकी वाहनांची फिल्म हटवून त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा कराड वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.