नोकरीच्या पहिल्याच दिवशी काळाचा घाला! ट्रकखाली चिरडून ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Rokhthok Maharashtra 3 0

नोकरीच्या पहिल्याच दिवशी पार्सल पोहोचवण्याच्या धावपळीत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला… उल्हासनगरमध्ये घडलेल्या या भीषण अपघाताने एका कुटुंबाचा आधार हिरावला आहे.
सूरज उर्फ सागर श्रीकृष्ण खरे (वय ३२) हा डिलिव्हरी बॉय म्हणून पहिल्याच दिवशी कामावर रुजू झाला होता. गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना स्वर्गीय केणे चौकात त्याच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात तो ट्रकच्या चाकाखाली चिरडला गेला.
स्थानिक भाजप पदाधिकारी नीलेश बोबडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सूरजला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
विठ्ठलवाडी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. तीन बहिणींचा लाडका भाऊ आणि आई-वडिलांचा आधार असलेल्या सूरजच्या मृत्यूने खरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.